महाड : प्रतिनिधी
वेदा जनजागृती मंच आयोजित जाणता राजा मॅरेथॉनमध्ये पर्यावरणाचा संदेश देत रविवारी (दि. 2) महाडकर धावले. मिसेस इंडिया राखी सोनार यांनी नातेखिंड येथे झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले.
या स्पर्धेत पाच किमीच्या खुल्या गटात दापोलीच्या सिद्धेश बर्जे याने प्रथम क्रमांक पटकावला. ओमकार बैकर आणि सिद्धेश भुवड यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. एक किमीच्या 10 ते 14 वयोगटात ओमकार अमोल शिंदे अव्वल ठरला. 14 ते 16 वयोगटात दापोलीच्या रोहित रामचंद्र काताळे याने प्रथम क्रमांकाला गवसणी घातली. 35 ते 60 वयोगटात चंद्रकांत पांडुरंग साळावकर पहिले आले, तर ज्येष्ठ नागरिक गटात नथुराम गणपत पवार आणि सलाउद्दीन जैरुद्दीन पल्लवकर यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.
राष्ट्रीय स्मारकातील सभागृहात आमदार भरत गोगावले, मिसेस इंडिया राखी सोनार, साहित्यिक प्रभाकर भुस्कुटे, डॉ. हिंमत बावस्कर, डॉ. दिगंबर गिते, दादुलाल जैन, महाड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, मीनल बुटाला, कुद्रिमोती यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.