Breaking News

योग केंद्राचा 31वा वर्धापन दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल परिसरातील नागरिकांना योगाभ्यासाचे धडे देऊन त्यांना ‘फिट अ‍ॅण्ड फाइन’ ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणार्‍या पनवेलच्या योग केंद्राने नुकतीच 31 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. शनिवारी (दि. 1) व रविवारी (दि. 2) चिंतामणी सभागृहात झालेल्या केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पनवेलमधील सुप्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. कांचन जनार्दन यांनी कान-नाक-घसा यांची काळजी या विषयावर मुलांशी संवाद साधला.

डॉ. मंजिरी वैद्य, महेश सिनकर आणि आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन दादासाहेब विसपुते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. योग आणि आरोग्याला वाहिलेल्या ‘योग सखा’च्या ध्यान-धारणा विशेषांकाचे प्रकाशन दादासाहेब विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले. योग केंद्राचे संस्थापक-संचालक पु. ल. भारद्वाज वयाच्या 94व्या वर्षीही कार्यरत आहेत ही केंद्राची जमेची बाजू आहे, असे गौरवोद्गार विसपुते यांनी काढले. कार्यक्रमाच्या चारही सत्रांत योगाभ्यासी विद्यार्थी आणि शिक्षकांनी योगासनांची सुंदर प्रात्यक्षिके करून दाखविली. सूर्यकांत फडके यांनी प्रास्ताविक केले, तर ‘योग सखा’च्या कार्यकारी संपादिका मानसी वैशंपायन यांनी ‘योग सखा’ अंकाची वाटचाल कथन केली.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply