Breaking News

मराठा आरक्षणाला स्थगितीस ‘सर्वोच्च’ नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने बुधवारी (दि. 5) सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता 17 मार्चला सुरू होणार आहे.
राज्य सरकारने शिक्षण आणि शासकीय नोकर्‍यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होतेे, मात्र मुंबई हायकोर्टाने या संबंधातील याचिका फेटाळून लावली. या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. इंदिरा साहनी प्रकरणी घटनापीठाने निश्चित केलेल्या आरक्षणावर 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. यावर बुधवारी सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला.
यापूर्वीदेखील सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. जुलै 2019मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात देण्यात आलेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्या वेळी तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षणावर पूर्वलक्ष्यी प्रभावाबाबतचा निर्णयही स्थगित केला होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply