पनवेल : कोळखे ग्रामपंचायतीच्या दहा टक्के निधीतून विधवा, परितक्त्या व निराधार महिलांना उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सदस्य रत्नप्रभा घरत, सदस्य तनुजा टेंबे, सरपंच विजया सुरते, उपसरपंच लादमिन दीदी, ज्ञानेश्वर बडे, ग्रामसेवक सुहास वारे, आनंद ढवळे आदी उपस्थित होते.