Breaking News

विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही -आमदार महेश बालदी

रानसईत सामाजिक सभागृह उभारणीचा शुभारंभ, आदिवासींना नौका व मच्छीमार जाळ्याचे वाटप

उरण : रामप्रहर वृत्त
केंद्रात व राज्यात सर्वसामान्यांचे, आपले सरकार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी शनिवारी (दि. 1) उरण तालुक्यातील रानसई येथे केले.
उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे वेगाने होत आहेत. अशाच प्रकारे रानसई येथे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून आणि खोटपे येथील ऑल कार्गो लॉजिस्टीक लिमिटेडच्या सीएसआर फंडातून सामाजिक सभागृह उभारण्याचा शुभारंभ तसेच आदिवासी विकास बजेट अंतर्गत पाच नौका व मच्छीमार जाळे वाटपाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास रानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच राधा पारधी, कार्गो कंपनीचे अंबादास यादव, नीलरतन शेंडे, चंद्रकांत पाटील, समीर मढवी, कमलाकर टाकळे, जीवन टाकळे, शेखर कानडे, रत्नाकर घरत, दीपक पाटील, दमकूशेठ पाटील, शाम लेंढे, सुरेश पारधी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply