Breaking News

‘विस्डन’च्या ऑल फॉरमॅट संघाचे विराटकडे कर्णधारपद

भारताच्या एकूण चार खेळाडूंचा संघात समावेश

लंडन ः वृत्तसंस्था
जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विस्डनने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार्‍या खेळाडूंचा संघ बनवला असून त्याचे कर्णधारपद विराटकडे सोपविण्यात आले आहे. या टीममध्ये एकूण चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
असा आहे संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह (सर्व भारत), जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर (इंग्लंड), ट्रेंट बोल्ट, केन विल्यमसन (न्यूझीलंड), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) आणि राशिद खान (अफगाणिस्तान).
राहुल द्रविड भारताचा हेड कोच
नवी दिल्ली ः भारताचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौर्‍यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय)
अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply