नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ व देवी आंबा माता चरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव बुधवारी (दि. 19) खांदा कॉलनी येथील सेक्टर 13च्या देवी आंबा माता मंदिरात
साजरा करण्यात येणार आहे.
प्रथम सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत खांदा कॉलनी येथील माऊली कृपा महिला भजन मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. यात गायिका : प्रतिक्षा गोडसे, सुवर्णा कदम, रेखा खोत, रोहिणी तुळसणकर, वादक : प्रथमेश गोडसे, सिध्देश गोडस असणार आहेत. यानंतर सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मराठमोळा गीतांचा अनमोल ठेवा सरगम प्रस्तुत गर्जा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गायक : नरेश पाटील, अजय तेजे, गायिका : दया बाबरे, संविदा पाटकर निवेदिका : संगीता थोरात असणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक मंडळाचे अध्यक्ष तथा पनवेल पनपचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष भास्कर वाय. शेट्टी, अशोक ठक्कर, सचिव सुरेश खानविलकर, खजिनदार नरेंद्र तुरे, सदस्य पांडुरंग म्हात्रे, संतोष धनावडे, भागराम हाटे, श्रीकांत म्हात्रे, सुहास पाटील, राज महापुरकर, संजय कांबळे, वासुदेव गुरव, नरेश पाटील, विवेक पाटील, गोविंद खेतम, राजेंद्र कांबळे, रविंद्र चौधरी, गोपिनाथ लोखंडे, प्रविण भोसले, नंदकुमार कुरुगन, पांडुरंग पाटील, मुरलीधर शिंदे, लक्ष्मण दाढावकर, तुकाराम कुरळे, रमेश बाबु पाटील, भाऊसाहेब पाटील, शिवाजी पाटील, हनुमंत गवळी, अनंत मोगारकर, हरिभाऊ ठाकूर, विठ्ठल चव्हाण, अमोल खंडीझोड, साईप्रसाद बुरुपल्ले हे आहेत.