Breaking News

भाजपच्या माजी नगरसेवकाने स्वखर्चाने हटविल्या भंगार गाड्या

नवी मुंबई : प्रतिनिधी

दारावे गावाच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या पोलीस गुन्ह्यात जप्त केलेल्या भंगार अवस्थेत असणार्‍या गाड्या स्थानिक माजी नगरसेवक सुनील पाटील यांनी स्वखर्चाने हटवल्या. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या गाड्या नागरिक आणि वाहन चालकांना अडथळा ठरत होत्या.

नेरूळ पोलिसांनी विविध गुन्ह्यात या गाड्या जप्त केल्या होत्या. त्या संदर्भात भाजपचे माजी नगरसेवक सुनील पाटील यांनी आरटीओ व नेरुळ पोलीस स्टेशन याना पत्रव्यवहार करून नागरिकांना अडथळा होत असलेल्या गाड्या हटवण्यासाठी विनंती केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत यांनी परवानगी दिल्यावर सुनील पाटील यांनी स्वखर्चाने मिशनरी व कर्मचारी यांच्या मदतीने गाड्या हरवल्या आहेत.

या कार्यात शरद पाटील, सिद्धार्थ नाईक, अतिश पाटील, ऋतिक नाईक, अतिश भोईर, आदित्य पाटील, हिराआर्केड कुलकर्णी, वाघमोडे, गडदे यांनी योगदान दिले.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज …

Leave a Reply