Breaking News

सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक

कामोठे : रामप्रहर वृत्त

जगतगुरु संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची जयंती शनिवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात कामोठे येथे साजरी

करण्यात आली. या वेळी संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची कामोठे शहरात रथातून मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीची सुरुवात पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य सभापती, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आली. तसेच यानिमित्ताने सुषमा पाटील विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुणकुमार भगत आणि नगरसेविका हेमलता गोवारी तसेच जय सेवा वसंत बंजारा सामाजिक संस्था, जय सेवालाल ग्रुप, श्री सेवा गोर बंजारा महिला मंडळ, बंजारा समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply