Breaking News

गुटखा विक्री करणार्या 20 जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा या मालाची अनाधिकृतपणे विक्री करणार्‍या 20 जणांविरुध्द रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली.

अलिबाग व परिसरात तसेच शाळा-महाविद्यालयांनजीक असलेल्या लहान-मोठया दुकानांतून गुटखा व तत्सम मालाची छुप्या पध्दतीने विक्री केली जात होती. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश रायगड पोलीस अधीक्षक अनिल परासकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक शेख यांनी अलिबाग व परिसरात शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा या मालाची अनाधिकृतपणे विक्री करणार्‍या इसमांबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. सस्ते, उप निरीक्षक ए. जी. वळसंग आणि 30 पोलीस कर्मचारी यांचे खास पथक नेमून त्यांना संकलित केलेली माहिती व छापा कारवाईबाबत मार्गदर्शन केले. या पथकाने सोमवारी (दि. 15 एप्रिल) अलिबाग व परिसरातील 19 लहान-मोठया दुकानांवर छापा टाकून एकुण 1,11,418रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. व 18 इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply