Breaking News

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला ’स्लो’; सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची प्रचंड गर्दी

लोणावळा : प्रतिनिधी

शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांना जोडून आलेल्या महाशिवरात्रीच्या सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनांतून घराबाहेर पडल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भल्या पहाटेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने एक्स्प्रेस वेचा वेग सकाळपासूनच मंदावला होता.

खालापूर टोलनाक्यावर लांबवर वाहनांच्या रांगा लागल्याने फास्ट टॅगपासून सर्वच यंत्रणा कोलमडली. टोल भरण्याकरिता वाहनांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे खंडाळा घाट चढायला सुरुवात केल्यानंतर फूड मॉल ते खंडाळादरम्यान मुंगीच्या संथगतीने वाहने पुढे सरकत होती. वाहनांची संख्या वाढल्याने वेग कमी झालेला असताना घाटाचा अवघड टप्पा चढताना काही ठिकाणी अवजड वाहने बंद पडणे, गरम होणे असे प्रकार होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती.

दरम्यान, राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयाबाबत विविध स्तरांतून वेगवेळ्या प्रतिक्रिया  उमटत असताना त्यांना मिळालेल्या सुटीमुळे त्याचा वाहतूकीवरही ताण पडणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. सलग तीन दिवस सुट्या मिळाल्याने अनेकांनी लोणावळ्यासह कोल्हापूर, महाबळेश्वर, भीमाशंकर, शिर्डी, पंढरपूर आदी पर्यटनस्थळी तसेच देवदर्शनाचा बेत आखत घराबाहेर पडणे पसंत केले. वाहतूक कोंडी टाळण्याकरिता सर्वच सकाळी बाहेर पडल्याने सकाळीसच घाट परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बोरघाट पोलीस व खंडाळा टॅप पोलीस वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता प्रयत्न करीत असले तरी ते वाहनांच्या संख्येपुढे कुचकामी ठरत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply