लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई उलवे नोड मातंग चेतना परिषद यांच्या वतीने स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर साहित्यिक व विचारवंत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती उत्सव उलवे नोड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर साहित्यिक व विचारवंत, साहित्यरतक् लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीचे औचित्य साधून उलवे नोड सेक्टर 20/21 येथील एका चौकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले असून या चौकाचे आणि वाचनालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित झाले. या वेळी वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, रवीशेठ पाटील, प्रमुख वक्ते संपत जाधव, आयोजक आनंद शिंदे, सुरेश राणा, शशी भानुशाली, किशोर आल्हाट, संग्राम तोगरे, गोरक्ष नवले, गोपाळ वाघमारे, वैजनाथ कांबळे, भीमराव लोखंडे, संदीप नामवाड आदी उपस्थित होते.