Breaking News

महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्मकुमारीजतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (दि. 21) नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारीजच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवध्वजारोहन करून कार्यक्रमांचे  उद्घाटन करण्यात आले.

पनवेल तालुक्यात महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीनिमीत्त नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारीजच्या वतीने ‘ज्योतिर्लिंगम दर्शन तथा शिवरात्री महत्त्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डीन डॉ. सुरेखा पाटील, पनवेल महापलिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, सुप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. कीर्ती समुद्र, पनवेल डॉक्टर जी. पी. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, राजयोगिनी तारादीदी, डॉ. शुभदा नील यांसह पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply