बीड : प्रतिनिधी आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडी सरकारचे अधिवेशन मुंबईमध्ये होत असतानाच आता धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत 26 फेबु्रवारीला धनगर समाज सुंबरान आंदोलन करणार आहे. बीडमध्ये धनगर समाजाच्या राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना यशवंत सेनेचे संस्थापक भारत सोन्नर यांनी या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा दिला आहे.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …