Breaking News

माणगावजवळ एसटीला टेम्पोची धडक

एक जखमी, दोन्ही वाहनांचे नुकसान

माणगाव : प्रतिनिधी

मुुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील इंदापूर गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास एसटी बसला समोरुन आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाच्या गुहागर आगाराचे चालक चांद नजीर शेख (वय 31, रा. बाराबाभली, जि. अहमदगनर) हे त्यांच्या ताब्यातील बस (एमएच -14, बीटी-2270) घेवून मुंबईकडे जात होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास इंदापूर गावाच्या हद्दीत समोरुन भरधाव वेगात आलेल्या टेम्पो (जीए-04, टी-5462)ची  एसटी बसला धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक सुरज चंद्रकांत सांब्रेकर (वय 19, रा. शिरोडवाडी, गोवा) हे जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली, असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply