Breaking News

कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे शुभचिंतन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

कामोठे : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन बुधवारी

(दि. 26) करण्यात आले होते. हा सोहळा रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी मल्टीमीडिया सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सोहळ्यात सहाय्यक शिक्षक सूर्यकांत खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी स्कूलचे चेअरमन स्वामी म्हात्रे, व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, चाळाराम चिपळेकर, प्रभुदास गोवारी, बंडू म्हात्रे, मल्टीमीडिया सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवाजी दांगट, सचिव चंद्रकांत शिर्के, खजिनदार भूषण साळुंखे, अशोक गोरडे, राजू म्हात्रे, प्रदीप पवार, संदीप शेळके, अरुण ढगळे, योगेश तांबे आदी उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply