Breaking News

खारघर शहर नवीन कार्यकारणीचे मान्यवरांकडून अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची खारघर शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे रविवारी (दि. 23) अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यकारणीमध्ये खारघर मंडळ महिला मोर्चा अध्यक्षपदी वनीता विजय पाटील, खारघर मंडळ उपाध्यक्षपदी दिलीप जाधव, खारघर तळोजा मंडळ सरचिटणीसपदी दीपक शिंदे, खारघर मंडळ उद्योग आघाडी संयोजकपदी राजेंद्र मामा मांजरेकर, खारघर मंडळ सोशल मीडिया संयोजकपदी अजय माळी यांची निवड झाली आहे. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले. या वेळी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग समिती ‘अ’चे सभापती शत्रुघ्न काकडे, खारघरच्या राजाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील, संदीप एकबोटे, संतोष शर्मा, मनोज शारबिद्रे, अशोक कांबळे, अशोक पाटील, अशोक पवार, एकनाथ मन्यार, विनय पाटील, आदित्य मावळे, संध्या शारबिद्रे, वैष्णवी शिंदे, अश्विनी पाटील, रायश्री नायडू, चंदादेवी परिहारीया, सविता कुलकर्णी, रेखा किरपे, वैशाली हजारे, शीतल मोरे, विजया पाटील, प्राची म्हात्रे, कुंदा घेमुड, विजया ठाकूर, सारिका पाटील, भारती कांबळे, प्रतिभा पाटील, सुरेखा दिसले, मनीषा तोतला, विजया पोपेटा, अलका वायदंडे, पूनम पाटील व खारघरच्या श्री समर्थ महिला मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply