पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील पोयंजे कातरकीवाडी येथे श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवारी (दि. 26) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले.
पोयंजे येथे कान्हाशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून मंदिर उभारण्यात आले आहे. त्यानिमित्त श्री रामपंचायतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कान्हाशेठ ठाकूर, देवकू ठाकूर, प्रवीण खंडागळे, रामसाद पाटील, महिन पाटील, हभप वामन महाराज भोईर, श्यामशेठ मोरे, श्याम ठाकूर, राम मोकल, जगदिश मते, ‘वादळवारा’चे संपादक विजय कडू, पत्रकार सय्यद अकबर, साहील रेळेकर, सोहीदास चोरघे, रवींद्र गायकवाड, स्वप्नील ठाकूर, रोशन ठाकूर आदी उपस्थित होते.