खोपोली : प्रतिनिधी
नेरूळ येथे झालेल्या फुनाकोशी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत खालापूरमधील डॉ. देव मार्शल आर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि 11 कांस्य अशी एकूण 20 पदकांची कमाई करीत दबदबा दाखवून दिला.
नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी जपानहून शिहान केविन आणि दक्षिण अफ्रिकेहून शिहान एरिक उपस्थित होते. या वेळी खालापुरातील डॉ. देव मार्शल आर्ट्स अकादमीच्या आर्य राऊत, सानवी वारंग यांनी प्रत्येकी एक सुवर्ण एक कांस्य, मोहन देवकातेने एक सुवर्ण, ईश्वरीने एक रौप्य व एक कांस्य, अनिष बांदेकर, विदित शर्मा व अजन शिंदे यांनी प्रत्येकी एक रौप्य, तर अनुष्का गायकवाड, कृपा मेहतर, करण शेटे, रणवीर सूर्यवंशी, धीरज पंडित व नितीन बोंदार्डे यांनी कांस्यपदक जिंकले.
यशस्वी खेळाडूंना संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक सेन्साई डॉ. महादेव शिंदे, सेन्साई नागेश बांदेकर, विल्सन डिसूझा, नितीन बोंदार्डे, मिलिंद जोगावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीबद्दल देव मार्शल आर्ट्स अकादमीच्या खेळाडूंचे कौतुक होत आहे.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …