पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन दिघाटी गावात रविवारी (दि. 1) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, उद्योगपती बालुशेठ पाटील, केळवणे विभागीय पंचायत समितीचे अध्यक्ष हिरामण ठाकुर, उपसरपंच रोहिदास शेडगे, कर्नाळा ग्रामपंचायतींचे सदस्य विद्याधर जोशी, माजी उपसरपंच दत्तात्रेय पाटील, केळवणे जिल्हा परिषद मतदारांचे अध्यक्ष मंगेश वाडीकर, ग्रामपंचायतींचे सदस्य मनोहर पाटील, राजेश ठाकुर, ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, गणेश पाटील, प्रमोद पाटील, मच्छिंद्र पाटील, बंडु पाटील, नितेश शेडगे, प्रशांत पाटील, नंदकुमार पाटील, केळवणे विभागीय युवा मोर्चा उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, प्रभाकर ठाकूर, सचिन पाटील, पुंडलिक पाटील, आत्माराम पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते. ग्रामस्थांनी या वेळी आमदार महेश बालदी यांचे शाल व पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले.