Breaking News

प्रभात कोळीची उतुंग कामगिरी; आशिया खंडातील ठरला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू

पनवेल : रामप्रहर वृत्त
आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने अमेरिकेतील लेक टाहो (35 किमी) अंतर 12 तास 37 मिनिटांत पार केले असून अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान प्रभातने मिळवला आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनचा कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकावणारा देखील आशिया खंडातील तो पहिला जलतरणपटू ठरला.
कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन या वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या नामांकनामध्ये अमेरिकेतील कॅटलिना चॅनेल (34 किमी) सांताबार्बारा चॅनेल (20 किमी) तसेच लेक टाहो लेंगथ स्विम (35 किमी) या अतिशय खडतर जलतरण मोहिमांचा समावेश आहे. प्रभात कोळीने ही तिन्ही आव्हाने यशस्वीरित्या पार करीत आशिया खंडातील प्रथम जलतरणपटूचा मान मिळविला. लेक टाहोमध्ये जलतरण करण्यासाठी प्रभातने प्रथम उलवा नोड येथे असलेल्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये सराव केला असून त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रभातने विशेष आभार मानले.
प्रभातने ट्रिपल क्राऊन ऑफ ओपन वॉटर हे नामांकन 2017मध्ये पटकावले होते. आजतागायत आंतरराष्ट्रीय 18 जलतरणाच्या मोहीम फत्ते करणारा एकमेव भारतीय जलतरणपटू आहे. प्रभातला भारत सरकारने तेनझिंग नोर्गे पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते 2019 साली, तसेच शिवछत्रपती पुरस्काराने 2020मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. प्रभातच्या पराक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्, तसेच लिमका बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये पाच विक्रमांची
नोंद करण्यात आली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply