Breaking News

‘मोहोपाडा बाजारपेठ दुपारपर्यंतच खुली राहणार’

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी परीसराची मुख्य बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा येथे रसायनी पाताळगंगा व आसपासच्या परिसरातील नागरिक येत असतात. कोरोना पार्श्वभूमीवर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन यांच्यात संगनमत होवून मोहोपाडा नवीन पोसरी बाजारपेठ लॉकडाऊन काळात सध्या तीन मेपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे ठरले असल्याचे सरपंच ताई पवार आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदिप पाटील यांनी बोलताना सांगितले. मोहोपाडा बाजारपेठ संध्याकाळी सुरू राहणार या अफवेवर विश्वास ठेवू नये असेही सरपंच यांनी सांगितले. कोरोनापासून रसायनी करांचा बचाव व्हावा या दृष्टीकोनातून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने ’गो कोरोना’ वर मात करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. रसायनीकरांना लॉकडाऊन कालात जिवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत मोहोपाडा बाजारपेठ सुरू राहणार आहे. यानंतर नागरिकांनी विनाकारण बाजारपेठेतून चक्रा मारु नयेत तसेच जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply