Breaking News

कोरोनाबाधित रुग्णांना आता मिळणार ऑनलाइन मार्गदर्शन; पनवेल महापालिकेचा अभिनव उपक्रम

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेलकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून कोरोनाबाधित रुग्णांना सोमवार (दि. 24)पासून वेबेक्स अ‍ॅपच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य कृती दलाच्या सदस्यांकडून ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईच्या मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयातील डॉ. राहुल पंडित यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन वेबिनारचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका राबविणार आहे. नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका लसीकरणावर भर देत आहे. वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली जात आहे. बाधित रुग्णांना आहार, औषधे व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळावीत या हेतूने राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य कृती दलाचे नामांकित सदस्य फोर्टीस रुग्णालयातील डॉ. राहुल पंडित, डॉ. चारुदत्त वैती, डॉ. बिंदू यांच्यामार्फत सोमवारपासून वेबेक्सच्या माध्यमातून ऑनलाइन वेबिनार महापालिकेमार्फत घेण्यात येणार आहे.

तज्ज्ञ देणार प्रश्नांची उत्तरे

मार्गदर्शन सत्रांमध्ये विविध प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ देणार आहेत. दिवसातून चार-पाच वेळेला या मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून रुग्णांना माहिती दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकांच्या माध्यमातून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहेत. रुग्णांनी त्यांच्या किंवा निकटवर्तीयांच्या मोबाइलमध्ये वेबेक्स अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply