सभापती देवकीबाई कातकरी, सदस्या रत्नप्रभा घरत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गव्हाण 1च्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गव्हाण ग्रामपंचायतीच्या सभागृहात गव्हाण विभागातील अंगणवाड्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप शुक्रवारी (दि. 6) करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी आणि सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प-गव्हाण 1 अंतर्गत अंगणवाड्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, सदस्या योगीता भगत, सुनिता घरत, उषा देशमुख, कामिनी कोळी, विजय घरत, हेमंत पाटील, रोशन म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शेडगे, पंचायत समिती आयसीडीएस प्रकल्प 1 च्या पर्यवेक्षिका चौगुले मॅडम यांच्यासह पदाधिकारी, शिक्षिका, गव्हाण जिल्हा परिषद गणातील येणार्या 30 ते 35 अंगणवाडी सेविका व मदतणीस आशावर्कस महिला कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.