उरण : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालण विभाग फुंडे येथे चला उद्योजक घडवूया या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकताच करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजीवन म्हात्रे हास्य प्रबोधनकार व आगरी-कर्हाडी कोळी उद्योजक संस्थेचे अध्यक्ष संजीवन म्हात्रे होते. त्यांनी आपल्या बहारदार हास्य शैलीत विद्यार्थ्यांनी उद्योजक का व्हावे व उद्योजक होण्यासाठी आपल्या स्वतः मध्ये फक्त हिम्मत सातत्य व विनम्रता आवश्यक आहे. आपण करू इच्छित उद्योगाच्या संकल्पना महाविद्यालया मार्फत पोहोचवा, आमची संस्था व आपले यशस्वी उद्योजक आपणास आवश्यक ती सर्व मदत करेल असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार हे उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन सांगितले, वीर वाजेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी उद्योजक कसे बनतील या प्रयत्नात आजची ही उद्योजक घडवुया कार्यशाळा हे पहिले पाऊल आहे. पुढील शैक्षणिक वर्षांत उद्योजक व्हावे असे वाटणार्या 100 विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येईल व त्यांना उद्योजक होण्यासाठी लागणारी सर्व माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येईल असे जाहीर केले.