Breaking News

उदय देवरे ’विहान श्री’चा मानकरी

नागोठणे : प्रतिनिधी

विहान बॉडी केअरच्या वतीने ’विहान श्री 2020’ ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा येथील जोगेश्वरीमाता देवस्थानच्या रंगमंचावर शनिवारी (दि. 7) सायंकाळी पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच सुरेश जैन, रोहे तालुका भाजप अध्यक्ष सोपान जांबेकर, पिगोंडे ग्रामपंचायत सरपंच संतोष कोळी, भाजप तालुका सरचिटणीस आनंद लाड, भाई शिर्के, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, भाजप महिला शहर अध्यक्षा श्रेया कुंटे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील 80 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. अटीतटीच्या लढतीत विभागातील चिकणी येथील उदय देवरे याने बाजी मारत ’विहान श्री 2020’वर आपले नाव कोरले. देवरे पनवेलच्या शेळके जिमचा खेळाडू आहे. विजेत्यास रोख रक्कम आणि करंडक देऊन गौरविण्यात आले. या वेळी शरीरसौष्ठवपटू लीलाधर म्हात्रे यांसह सचिन कळसकर, किशोर म्हात्रे, सुनील लाड, आनंद लाड, संघटनेचे अध्यक्ष भरत गिजे, बाळू रटाटे आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरत गिजे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन लाड, संदीप कोळी, दिनेश घाग, शेखर गोळे, जुबेर पानसरे, सचिन तिवारी, नरेश भंडारी, रूपेश पिंपळे, शैलेश ढाणे, सागर शिर्के, कुणाल गायकवाड, मंगेश केदारी, गोरख ढोले, अनिल पाटील, मनोज बोंडेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply