Breaking News

द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची घोषणा; हार्दिक पांड्याचे पुनरागमन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्चपासून सुरू होणार्‍या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी (दि. 7) घोषणा करण्यात आली. 29 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएलआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. 15 सदस्यीय संघात सुनील जोशी यांच्या निवड समितीने हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना संधी दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक टी-20 स्पर्धेत हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली होती. त्यातच रोहित शर्मा अजूनही दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे शिखर धवनला आणखी एक संधी देण्यात आली आहे. या मालिकेसाठीही विराट कोहलीकडेच भारतीय संघाचे नेतृत्व असणार आहे.

भारताचा वन डे संघ ःशिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply