पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत व जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सिनिअर राज्यस्तरीय व सातवी सबज्युनिअर पुरुष व महिला तसेच मुले व मुली राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 19 ते 21 फेब्रुवारीदरम्यान जळगाव येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी रायगड संघाची घोषणा करण्यात आली आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रायगड जिल्हा संघाच्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेतून प्राविण्यप्राप्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड चाचणीतूनही काही खेळाडूंची निवड करण्यात आली असून, जिल्हा संघाची घोषणा रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्ष तथा पनवेलच्यरा नगरसेविका सीता पाटील, सचिव स्वप्नील वारांगे, निवड चाचणी प्रमुख मंदार मुंबईकर यांनी जाहीर केली. यामध्ये सबज्युनिअर गटात मुलांमध्ये आरुष निट्टूरे, अश्विन प्रभू, सिद्धेश करांडे, आदित्य यादवम सबज्युनिअर गटात मुलींमध्ये दिक्षा वाल्वे, अहना भूषण यांची निवड करण्यात आली आहे, तसेच सिनिअर मुले गटातून यश वारके, निशांत गायकवाड, स्वप्नील वारंगे तसेच सिनिअर गटातून मुलींमध्ये प्रतीक्षा शेकर यांची निवड करण्यात आली आहे.
रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशन व सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ज्युनिअर-सबज्युनिअर सॉफ्ट टेनिस स्पर्धा 2020-21 खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे झाली.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …