उरण : प्रतिनिधी
उरण शहरासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण परिसरातील गावागावात होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह तरुणाईने विविध प्रकारच्या वेशभूषा करून ढोलताशांच्या गजरातील नाचगाण्यात सहभागी होऊन होळीचा आनंदोत्सव साजरा केला. सावडीच्या ओल्या ताज्या वृक्षाची साकारण्यात आलेली हवालुबाई आणि तिच्या समवेत असलेला मुलारी यांना कागदी रंगीबेरंगी पताका आणि फुलपानांनी करण्यात आलेली पर्यावरण पूरक सजावट आजच्या प्रदूषण युगात अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी पर्यावरणाचा र्हास होणार नाही, यासाठी अधिक दक्षता घेण्यात येत असल्याचे दिसून येत होते.