Breaking News

लिमये वाचनालयात महिला दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पनवेलमधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला.

माधुरी गोसावी, मीरा जाधव, प्रभा सहस्त्रबुध्दे, जोशी मॅडम यांच्या सोबतच समाजातील तळागाळातील पदपथावर फुले, भाजी विकणार्‍या, भंगार व कचरावेचक स्त्रियांचा गुलाब पुष्प, भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षिकांचादेखील सन्मान करण्यात आला.

हा सत्कार नगरसेविका रूचिता लोंढे तसेच वाचनालयाच्या ग्रंथपाल निकिता शिंदे, सहाय्यक ग्रंथपाल शारदा कदम, सहाय्यक स्नेहल चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य भालचंद्र झुरे यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत केले. प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक वत्सराज यांनी केले. महिला दिनाचा इतिहास व त्या अनुषंगाने उद्बोधक माहिती संस्थेचे कार्यवाह काशिनाथ जाधव यांनी दिली. सत्कारार्थींचा परिचय झुरे व गोरे यांनी करून दिला. अल्पोपाहार व चहापानानंतर या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम वालावलकर,

शेट्ये मॅडम, ग्रंथालयीन कर्मचारी निकेता शिंदे, शारदा कदम, स्नेहल गोईलकर, संजय दिवटे यांनी  मेहनत घेतली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply