पनवेल : वार्ताहर
तळोजा औद्योगिक असोसिएशनच्या (टीआयए) माध्यमातून तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रम ट्रस्टला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संघटनेचे प्रमुख संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनामुळे असंख्य लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे, म्हणून टीआयएने स्थानिक हद्दीतील तळोजा येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आपले असह्य जीवन जगत आहेत. या लोकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तू, आहार व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना महामारीमध्ये अत्यंत आवश्यक असणार्या साधनांचा उपयोग व्हावा म्हणून तळोजा औद्योगिक असोसिएशनने संघटनात्मक सहकार्याने संघटनेचे प्रमुख संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली उपक्रम राबविला. त्यात प्रामुख्याने वृद्धाश्रमात जाऊन निर्जंतुकीकरण सॅनिटायझर, मास्क, फेस कवर हँडवॉश लिक्विड, शरीर तापमान यंत्र, प्राथमिक उपचार किट, स्टीमर यंत्र अशी साधने दिली. खाद्यपदार्थांमध्ये रोज लागणार्या कडधान्य, मसाले, खाद्यतेल, ड्रायफूट, फळे, औषधे अशा विविध प्रकारच्या जीवनावश्यक वापरणार्या खाद्यपदार्थांचे पॅकेट त्यांना शारीरिक ताकत मिळावी म्हणून नियोजित पद्धतीने देण्यात आले. तळोजा असोसिएशनच्या सामूहिक संघटनांमध्ये अशा प्रकारचे सामाजिक कार्य टीआयएनेहमी आपले कर्तव्य समजून करते. समाजाला सहकार्य करण्यासाठी तळोजा औद्योगिक असोसिएशनच्या उद्योगसमूहातील वसुधा केमिकल, सिंधू ऑर्गानिक, बीजी इंटरप्राईजेस, फोर्टन स्टील, विनायक ऑरगॅनिक, प्रीमियम फुड्स, सिस्को रिसर्च, एशियन पेंट, एसएसकेएम स्टील, आयजीपीएल, वॉल टेक, जेपी फोर्ट, इसके डाय केमिकल, पी एनएस इंजीनियरिंग, मैसूर अमोनिया, की मित्सू, बोटली प्रॉडक्ट, सिक्कीम लॅब, मीनाक्षी फिशर्स, फ्याबीला, मिस्टर भाऊनेश्वरी गणेशन या संघटनात्मक सहकार्याने उपक्रम राबविण्यात आला.