Breaking News

नीलिमा पाटील यांना कोरोना योद्धा पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

सोनिया महिला मंडळाच्या संकल्पनेतून कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह याठिकाणी मंगळवारी (दि. 5) मोठ्या दिमाखदार पद्धतीने झाला.

या वेळी कोरोना काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक, पोलीस बांधव, पत्रकार बांधव आदींनी समाजसेवा केली त्यांच्या कार्याची दखल घेत सोनिया महिला मंडळाच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच मुकेश म्युझिकल मेलोडी (हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा) या मनोरंजनात्मक कार्यक्रमाने ह्या सोहळ्याची शोभा वाढवली. या वेळी सामाजिक क्षेत्रामध्ये  समाज कार्य करणार्‍या नीलिमा पाटील यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी सोनिया महिला मंडळाच्या अध्यक्ष सुहासिनी केकाणे, उपाध्यक्ष अंजली इनामदार, सरचिटणीस नीता माळी, खजिनदार अस्मिता गोसावी, चिटणीस म्हात्रे, चिटणीस निता मंजुळे यांनी उत्तम सोहळ्याचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply