कळंबोली : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात जसजसा उन्हाळा वाढु लागला की, माणूस तहानेने व्याकूळ होतो तशीच काहीशी अवस्था मुक्या पशुपक्षांची देखील होते. या गोष्टीचा विचार करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे पशुपक्षी. या पशुपक्षांसाठी हेमंतराजे धायगुडे पाटील सामाजिकदृष्ट्या पर्यावरणप्रेमी अभ्यासक पर्यावरणतज्ञ प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांनी पशुपक्षांसाठी वृक्षांवर पानवठे व पशुखाद्य भांडी उभारणी केली आहे व नागरिकांनाही आपल्या बालकणीत भांडी ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अतिवापर अथवा अपव्यय टाळणे गरजेचे आहे, आपण पाहतो कि उन्हाळा तापायला लागला की अनेक भागातील नागरिकांप्रमाणेच पशुपक्षी देखील पाण्यासाठी वणवण भटकत असताना दिसतात. मनुष्य आपली तहान अनेक प्रकारच्या माध्यमातून भागवु शकतो परंतु पशुपक्षांसाठी पाण्याची ठिकाणे शोधण्यासाठी स्थलांतर होण्याशिवाय पर्यायच नसतो व याकारणे अनेक पक्षांना आपला जीव गमवावा लागल्याचे चित्र दिसते एरवी नजरेस दिसणारे अनेक पशु पक्षी नामशेष होऊन दुर्मिळ होऊ लागले आहेत, यामुळे आजच्या पिढीला चित्रांतूनच अनेक पशुपक्षी दाखवावे लागत आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्षांसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याचा अपव्यय टाळत व पशुपक्षांसाठी विविध ठिकाणी वृक्षांवर पानवठे व पशुखाद्य भांडी उभारणी करत हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंचच्या वतीने हा निसर्गात्सव साजरा केला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी हेमंतराजे धायगुडे-पाटील विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हेमंत धायगुडे-पाटील, समाजसेवक यशवंत मोरे, महेशकुमार राऊत, दत्तात्रय धायगुडे पाटील, देविता मोरे, आदित्य मोरे, अनिकेत मोरे, अविनाश जगताप आदींनी परिश्रम घेतले.