Breaking News

मोहोपाडा परिसरात औषध फवारणी

मोहोपाडा : प्रतिनिधी

तुम्हीच तुमचे रक्षक या शासनाच्या घोषवाक्यानुसार वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी जंतुनाशक औषध फवारणी केली जात आहे. परिसरात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत पुढे सरसावली असून ग्रामपंचायत सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी कोरोनापासून परिसरातील ग्रामस्थांना वाचविण्यासाठी घरात रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी प्रयत्न चालू आहेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामी लागली असतानाच वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी विविध प्रकारे पावले उचलली जात आहेत. परिसरात जंतुनाशक फवारणी करुन कोरोना विषाणू संसर्ग होण्यासाठी पूरक वातावरण राहणार नाही व नागरिकांची सुरक्षा होईल या हेतूने वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत जंतुनाशकाची फवारणी सुरू आहे. परिसरातील सोसायटीत, गल्लीबोळात, रस्त्यांवर, गटार, नाल्यात, सार्वजनिक शौचालये, चौकात आदी ठिकाणी औषध फवारणी सुरू आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply