Breaking News

गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे उरणमध्ये गोरगरिबांना मदत

उरण : वार्ताहर

उरण शहरातील गणपती चौक येथील असलेले गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने गरजू व गरीब लोकांना शनिवारी  (दि. 28) धान्य वाटप करण्यात आले. हे वाटप ओएनजीसी, सीआयएफएस कॉलनी, उरण-पनवेल रोड समोरील झोपडपट्टी नवघर गावाजवळील झोपडपट्टी येथे प्रत्येकी तीन किलो तांदुळ व एक किलो डाळ देण्यात आली. सुमारे 450 किलो तांदुळ व 150 किलो डाळ वाटण्यात आली. गणपती देवस्थान ट्रस्टचे सर्व ट्रस्टी उपस्थित होते. या उपक्रमास नागरी संरक्षण दल उरणचे एम. के. म्हात्रे, विलास पाटील यांचे सहकार्य लाभले. उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला .कोरना संसर्ग विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. देशात सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने रोजगारांना काम मिळणे बंद झाले आहे. हातावर काम करणारे मजूर रोज मिळणारी मजुरीवर पोट भरणारे त्यांची कामे बंद झाली असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदतीचा हात देणे त्याचप्रमाणे वेळेवर मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा होय त्यामुळेच आम्ही ही मदत करीत आहोत, असे एका ट्रस्टीने सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply