Breaking News

अंगणवाडी सेविका, आशा वर्करची कार्यतत्परता

महिलेची यशस्वी प्रसुती

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनामुळे लॉकडाऊन असताना पनवेल तालुक्यातील न्हावा येथील एका महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात यश आले आहे. याकामी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी तत्परता दाखविली.
पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या रुची लाखन सिंग या गरोदर मातेच्या घरी अंगणवाडी सेविका सुनिता भोईर यांनी भेट दिली, तेव्हा रुची यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. भोईर यांनी तत्काळ याबाबत ग्रामपंचायतीला कळविले. लागलीच रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आणि आशा वर्कर संगीता भोईर यांना सोबतीला घेऊन सिंग यांना गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
काही वेळातच गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता बोंबाटकर यांनी रुची सिंग यांची तपासणी केली व त्यांची प्रसुती नॉर्मल होऊन त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ व माता दोघीही सुखरूप आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply