Breaking News

उरणमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

उरण : वार्ताहर

स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त उरण शहरात ध्वजारोहण कार्यक्रम रविवारी (दि. 15) साधेपणाने आणि शासकीय नियम पाळून झाला. नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक शाळा क्र. 3 मोरा येथे पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती राजेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळा क्र. 1 व 2 येथे महिला व बालकल्याण समिती सभापती स्नेहल कासारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समाज मंदिर भोवरा येथील प्रांगणात स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती गॅस यास्मिन मुहम्मद फाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, कौशिक शहा, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, धनंजय कडवे, रजनी कोळी, आशा शेलार, गॅस यास्मिन मुहम्मद फाईक, स्नेहल कासारे, जान्हवी पंडित, मेराज शेख, प्रियांका पाटील, दमयंती म्हात्रे, जगदीश पाटील, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, संजय दाते, आकाश कवडे, हर्षद कांबळे, संदेश शिरकुलकर, रसिदा शेख, धनेश कासारे, अनिल कासारे, सफाई कामगार, कर्मचारी उपस्थित होते. उरण तहसील कार्यालयाच्या प्रारणांत उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महसूल नायब तहसीलदार पेढवी, तसेच कर्मचारी आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply