अलिबाग : प्रतिनिधी
लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील सुंदर वेलनेस सेंटरतर्फे त्यांच्या साधकांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहे. या प्रयोगाचे योगप्रेमींकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
गतवर्षीच्या मार्च महिन्यात योगप्रशिक्षिका सायली वेंगुर्लेकर यांनी अलिबागमध्ये वेलनेस योग सेंटरची स्थापना केली. या योग सेंटरमध्ये अलिबाग परिसरातील जवळजवळ 80 साधक नित्यनेमाने दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेत योगसाधना करीत असतात, मात्र गेले काही दिवस कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे राज्यभर संचारबंदी जाहीर झाल्याने शासकीय आवाहनाला प्रतिसाद देत योगवर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
योगवर्ग बंद झाल्यावर प्रशिक्षिकेने नेमून दिलेली योगासने आणि क्रिया साधक आपापल्या घरी करीत होते. तरीही सर्वांनी एकत्र योगा करण्यामुळे अनुभवायला येणार्या ऊर्जेचा अभाव साधकांना जाणवत असलेल्याचे मत त्यांनी प्रशिक्षेकेकडे नोंदविले. यातून मोबाइलमधील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे योगवर्ग घेण्याची कल्पना पुढे आली आणि त्यानुसार जवळपास 50 योग साधक या ऑनलाइन दूरस्थ योग प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेत आहेत.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …