गव्हाण व प्रभाग बैठकांमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल व उरण तालुक्यात भाजपला वातावरण चांगले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्यासाठी वातावरण चांगले आहे. दोघांचाही विजय शंभर टक्के आहे, पण गाफील राहू नका, मतदारांपर्यंत पोहोचा, मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
‘पुन्हा आणू या आपले सरकार’ या शीर्षकाखाली शुक्रवारी पनवेल तालुका मंडळातर्फे महापालिका प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 13च्या बूथ कार्यकत्यांची बैठक कामोठे येथे जीवन ज्ञान साधना हॉलमध्ये झाली. या बैठकीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी नवनिर्वाचित पदाधिकार्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रके प्रदान करण्यात आली.
या कार्यकर्ता बैठकीस भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, भाजप नेते अतुल पाटील, नगरसेवक गोपीनाथ भगत, डॉ. अरुणकुमार भगत, नितीन पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका अरुणा भगत, संतोषी तुपे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, के. के. म्हात्रे, दिनेश खानावकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाणमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उलवे येथे कार्यकतार्र् बैठकीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या बैठकीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या बैठकीच्या वेळेस भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतच्या सदस्या हेमलता भगत, साईचरण म्हात्रे, विजय घरत, मदन पाटील, निर्गुण कवळे, सुधीर ठाकूर, अनंता ठाकूर, नीलेश खारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळेस भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका मंडळ अंतर्गत उलवे नोड 1 महिला मोर्चा अध्यक्षपदी निकीता खारकर यांची नियुक्ती करण्यात आली असून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले.