खोपोली ः पाली-खोपोली रस्ता कोकणाचे प्रवेशद्वार आहे. मुंबई उपनगरातून अनेक प्रवासी येथून वाहतूक करीत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकार्यांनी देताच खालापूर तालुक्याची शेवटची हद्द असलेल्या गोंदाव फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. सखोल चौकशी करूनच अत्यावश्यक सेवा पुरविणार्या वाहनांना परवानगी मिळत असून अनावश्यक वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अनावश्यक फिरणार्या वाहनांना माघारी पाठवत असून वाहनचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यास कठोर कारवाई करीत असल्याची माहिती पाली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई आर. डी. कांदे यांनी दिली आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …