पनवेल : रामप्रहर वत्त
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे महापालिका हद्दीत गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मालधक्का झोपडपट्टी, गणेशवाडी लोकमान्य नगरमधील झोपडपट्टी, कुष्ठरुग्ण बांधव, नवनाथ नगर येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून दूर राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटुंबीय उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गरीब, गरजूंना तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य सुरू केले. पनवेल भाजपच्या माध्यमातून ही मदत केली जात आहे. त्याबद्दल आभार मानण्यात आले.
उरणचे आमदार महेश बालदी आपल्या मतदारसंघातील गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत. कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत ही मदत आदिवासी वाडी, वस्त्यांवर पोहचवली जात आहे.
भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, महालण विभाग अध्यक्ष तथा माजी सरपंच महेश कडू, ग्रामसुधारणा मंडळ सोनारीचे अध्यक्ष दिनेश तांडेल यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील वाड्या, वस्त्यांवर जाऊन आदिवासी बांधव तसेच इतर गोरगरीब, गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या सुनीता वाघमारे, तुळसाबाई हापसे यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले.
या वेळी भाजप सरचिटणीस सुनील पाटील, सुरेश हापसे, नगरसेवक नंदू लांबे, चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, विद्याधर जोशी, शैलेश पाटील, सुदर्शन पाटील, नरेश रजपूत आदीही उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …