Breaking News

गरिबांपर्यंत मोफत धान्य पोहचवण्यासाठी राज्याने अटी मागे घ्याव्यात -देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या देशभरात जो लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे, त्या काळात प्रत्येक गरजू आणि गरिबाला तीन महिन्यांचे धान्य एकत्रित आणि मोफत मिळावे, यासंदर्भात स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या आदेशातील त्रुटी त्वरित दूर करून प्रत्येक गरजूला धान्य मिळेल हे सुनिश्चित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 3) राज्य सरकारकडे केली.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राज्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघांचे प्रभारी यांच्याशी संवादसेतूच्या माध्यमातून संवाद साधत राज्यातील भाजपच्या सेवाकार्याचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते.
या संवादसेतूमध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि इतरही नेते सहभागी झाले होते. त्यांनीही फडणवीसांच्या मागणीस सहमती दर्शविली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply