Breaking News

‘मरकज’ : 10 परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा; नवी मुंबई पोलिसांनी केली कारवाई

नवी मुंबई : बातमीदार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी मरकज या धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावून नवी मुंबईत परतलेल्या आणि पोलिसांना याबाबत माहिती न देणार्‍या 10 परदेशी नागरिकांवर रविवारी (दि. 5)  गुन्हा दाखल करण्यात आला.

फिलिपाईन्सचे हे नागरिक 10 ते 16 मार्चदरम्यान नवी मुंबईत दाखल झाले होते. ते वाशी येथील नूरल इस्लाम ट्रस्ट येथे राहत होते. त्यातील तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे उघड झाले. यापैकी एका आरोपीचा यापूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इतर सात जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या परदेशी नागरिकांमुळेच वाशी येथील तिघे कोरोनाबाधित झाल्याचा दावा नवी मुंबई महापालिकेने केला आहे.

फिलिपाईन्सच्या या 10 नागरिकांनी भारतात वैध प्रवेश करताना पारपत्र नियमांचे मात्र उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्यांनी नियमांचे पालन न केल्याने इतरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर पारपत्र कायदा व संसर्गजन्य रोग प्रतिबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply