उरण : वार्ताहर
महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, पाणदिव्याचे सुपुत्र मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविणार्या युवकांचा सन्मान, मुलांना खाऊ वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
चिरनेरच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेेचे पदाधिकारी आणि सदस्यांचा, तसेच चिरनेर परिसर कार्यक्षेत्रातील उरण वनविभागाच्या वनअधिकार्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. वनक्षेत्रात वणवा विझविण्याचे काम असो, मानवी वस्तीतून साप पकडून वनपरिसरात सोडून त्यांना जीवनदान देण्याचे कार्य असो किंवा वृक्षलागवड करून येथील पर्यावरणासाठी धडपड करण्याचे कार्य लक्षात घेऊन वाढदिवसानिमित्त 30 युवकांचे सन्मानपत्र व मेडल देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे, स्व. संगीता मच्छिंद्र ठाकूर फाऊंडेशन धुतुम आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे, या संस्थांना एकत्र करीत चांदायली वाडीतील मुलांना खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचा मोलाचा वाटा ठरला.
या वेळी जि. प.चे माजी सदस्य वैजनाथ ठाकूर, आदिवासी विकास प्रकल्प माजी नियोजन अधिकारी श्रीधर मोकल, महिला मंडळाच्या प्रमुख संतोष बेन, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, उपाध्यक्ष आनंद मढवी, काशिनाथ खारपाटील, पंकज घरत, रूपेश भोईर, विशाल पाटील, प्रतिक कोळी, बंटी मढवी, जतीन मढवी, विनित मढवी आदी उपस्थित होते.