Breaking News

मोहोपाडा व्यापारी असोसिएशनतर्फे गोरगरिबांना किराणा सामानाचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी – गोरगरिबांसाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी मोहोपाडा व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोपाडा व नवीन पोसरी परिसरातील गरजु व गोरगरिबांच्या 105 कुटूंबांना मोफत धान्यासह किराणा सामान वाटप करण्यात आले.

या वेळी परिसरातील आदिवासी बांधव, कलर काम करणारे कामगार, रोजंदारी करणारा कामगारवर्ग व गरजू गोरगरिबांना धान्यासह किराणा सामान मिलाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. यात दोन किलो तांदूळ, अर्धा किलो तुरडाळ, अर्धा किलो साखर, चहा पावडर, तिखट मसाला, एक लिटर गोडातेल, कांदे व बटाटे प्रत्येकी एक किलो आदी जीवनावश्यक वस्तुंचे गोरगरिबांना वाटप करण्यात आल्या. या वेळी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply