उरण : वार्ताहर
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सौजन्याने आतापर्यंत मतदारसंघातील किमान पाच ते सहा हजार आदिवासी परिवार तसेच मजूर वर्ग यांना जीवनावश्यक वस्तूंची सढळ हस्ते मदत करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिरनेर परिसरातील कोप्रोली व पुनाडे आदिवासी वाडी, भंगारपाडा तसेच चिरनेर येथील चार आदिवासी पाडे अशा एकूण 360 कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचे संकट सर्वत्र घोंघावत आहे. त्यामुळे लॉकडाऊन, संचारबंदी लागू असल्याने या काळात कुणीही उपाशी राहू नये याकरिता भाजप कार्यरत आहे. उरण तालुक्यातील आदिवासींना मदत करतेवेळी भाजप तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, महिला तालुकाध्यक्ष राणी सूरज म्हात्रे, चिटणीस कुलदीप नाईक, युवाध्यक्ष प्रवीण घासे, तालुका सहखजिनदार सुशांत पाटील, चिरनेर ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर, कळंबुसरेचे रूपेश पाटील, पं. स. गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, सारड्याचे कुणाल पाटील, पिरकोन गोव अध्यक्ष प्रमोद म्हात्रे, युवा नेता कल्पेश म्हात्रे, कोप्रोली गाव अध्यक्ष नंदन म्हात्रे, महिला गाव अध्यक्ष निशा प्रीतम म्हात्रे, गोवठणे गाव अध्यक्ष विश्रांती म्हात्रे, युवा नेते निलेश पाटील, विक्रांत पाटील, शिवप्रतिष्ठान कोप्रोलीचे सुदेश पाटील, गोवठण्याचे किरण म्हात्रे, नंदू चिरनेरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
‘नैना’साठी शेतकर्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका
आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्या मुंबईच्या अनुषंगाने नैना …