Breaking News

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पनवेल महापालिकेचे खास

ताप प्रतिबंधक दवाखाने

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्रांत खास ताप प्रतिबंधक दवाखाने सुरू केले आहेत.
नागरिकांनी ताप, घसा दुखणे व श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणे दिसल्यास पनवेल येथील जिल्हा कोविड रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी करू नये यासाठी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत तापासंबंधी खास दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. नमूद ठिकाणी जाऊन सोमवार ते शनिवार सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत तपासणी करून घ्यावी. रविवारी दवाखाना बंद राहील, असे कळविण्यात आले आहे.
नागरिकांनी येथे तपासणी करून घ्यावी
पनवेल-1 : भगत आळी, महाराष्ट्र व्यायामशाळेच्या समोर, गावदेवीपाडा; पनवेल-2 : ज्येष्ठ नागरिक हॉल, दर्ग्याच्या मागे, जुना ठाणा नाका रोड; नवीन पनवेल : बांठिया शाळेजवळ, समाजमंदिर, पहिला मजला, सेक्टर 18; खारघर : समाजमंदिर, कम्युनिटी सेंटर, सेक्टर 12, पेट्रोलपंपाजवळ; कामोठे : सेक्टर 8, प्लॉट नं. 32, एमएनआर शाळेच्या मागे; कळंबोली : समाजमंदिर बिल्डिंग, सेक्टर 5 (ई).

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply