Breaking News

गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

भाजप तालुकाध्यक्षांचा मदतीचा हात

माणगाव ः प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जनतेला मार्गदर्शनपर सूचना करीत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषाणूला डोके वर काढू न देण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. हे लॉकडाऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वाढण्याची शक्यता आहे. या काळात  गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे लक्ष देऊन भाजपचे माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दानशूरपणा दाखवत तालुक्यातील जवळपास शेकडो गरीब आणि गरजू कुटुंबांना मंगळवारी (दि. 7) जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्याचे वाटप केले. माणगावात मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी गरीब-गरजू कुटुंबीयांना अन्नधान्याच्या रूपाने मदतीचा हात दिला. हे अन्नधान्य मंगळवारी माणगावात पोलीस निरीक्षक रामदास इंगवले आणि भाजपचे माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी आपल्या हस्ते सोशल  डिस्टन्स ठेवून वाटले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेवर ओढवलेली उपासमारीची वेळ बघून भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी आतापर्यंत 500 कुटुंबीयांना जेवणाबरोबरच अन्नधान्याचे वाटप केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply