पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्थांचा पाठिंबा लाभत आहे. त्याअंतर्गत युनायटेड रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्रनेही आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाखहून अधिक मताधिक्य मिळविण्याकरिता आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासंदर्भातील पत्र अध्यक्ष समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सोमवारी प्रदान केले. या वेळी भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, भाजप नेते भीमसेन माळी, दिलीप खानावकर, चंद्रशेखर जळे, माजी नगराध्यक्ष मदन कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.