Breaking News

कमलपाड्यात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

श्रीगाव : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील कमलपाडा येथे रविवारपासून (दि. 26) श्रीराम कमलपाडा यांच्या वतीने व पोयनाड शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामधे प्रथम क्रमांक 10 हजार रुपए, द्वितीय क्रमांक सात हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक यांना प्रत्येकी पाच हजार रुपए व विजयी संघांना चषक देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. या स्पर्धेत तीनवीरा, लेभी, पेझारी, पोयनाड, शहाबाज, श्रीगाव परिसरातील 24 नामवंत संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. सर्व संघांनी शहाबाज येथील मैदानावर सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम कमलपाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply